Fri, August 12, 2022

रांची विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी; शोध मोहीम सुरू
Published on : 28 July 2022, 9:33 am
झारखंडची राजधानी रांचीमधून मोठी बातमी येत असून, रांचीमधील बिरसा मुंडा विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवरून रांची विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या धमकीनंतर रांची विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
रांची विमानतळ संचालक केएल अग्रवाल यांनी धमकी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केएल अग्रवाल यांनी सांगितले की, धमकीचा फोन आला होता. पण, चौकशीनंतर हा कॉल HOAX कॉल असल्याचे निष्पन्न झाले. धमकीच्या फोननंतर विमानतळ परिसरात सर्च ऑपरेशन करण्यात आले मात्र, काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Web Title: Threat Of Bomb Attack On Ranchi Birsa Munda Airport Through Phone Call
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..