आई-बाप, मुलाचा गळफास.. तिघेही रात्रभर जागले आणि शूट केला व्हिडीओ

suicide in haryana
suicide in haryana
Updated on

रण्यापूर्वी सुमारे साडेचार मिनिटांचे सात व्हिडिओ बनवून फेसबूकवर टाकले. ओमप्रकाश यांचा मुलगा सोनू याने ते व्हिडीओ केले होते. हा व्हिडिओ पहाटे साडेतीनच्या सुमारास टाकण्यात आला. यावरून हे स्पष्ट होतं की हे कुटुंब रात्रभर झोपलेलं नव्हतं. (Family committed suicide in Haryana)

हरयाणातील जिंदमध्ये नरवाना गावातील धनौरीत एका घरात वडील, आई आणि मुलाचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. संबंधित घटनेची माहिती मिळताच एसपी नरेंद्र बिजरानिया आणि एएसपी कुलदीप सिंह (SSP Kuldeep Singh )घटनास्थळी पोहोचले आणि तिघांचे मृतदेह नाल्यातून बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. (Haryana Family Suicide)

मृताचा पुतण्या नरेश मुलगा बलराज याच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केल्याचे एसपींनी सांगितले. 48 वर्षीय ओम प्रकाश, 45 वर्षीय कमलेश आणि त्यांचा 20 वर्षीय मुलगा सोनू अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी तिघांनी सुसाईड नोट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

मृत्यूपूर्वी 48 वर्षीय ओमप्रकाश, त्यांची 45 वर्षीय पत्नी कमलेश आणि 20 वर्षीय मुलगा सोनू यांनी पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याशिवाय मी, माझे आई-वडील हे खुनी नाही, असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. नान्हूला कोणी मारले हेही आम्हाला माहीत नाही. (suicide in haryana)

नातेवाईकांनी यासंदर्भात वेगळा आरोप केलाय. नातेवाईकांचं म्हणणं आहे की, गढी पोलीस स्टेशनचे प्रभारी पवन कुमार यांनी अन्य एका गटासह पीडितेच्या कुटुंबीयांना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी छळ केला होता. त्याला कंटाळून ओमप्रकाश आणि कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं.

बेपत्ता व्यक्तीचा मृतहेद गोणीत

21 नोव्हेंबर रोजी मृताच्या कुटुंबातील मणिराम उर्फ ​​नन्हू नावाचा एक व्यक्ती बेपत्ता झाला होता. त्यासाठी गढी पोलिसांनी व्यक्ती बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासादरम्यान 29 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झालेल्या मणिराम उर्फ ​​नन्हूचा मृतदेह गोणीत बांधलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मृत मणिराम उर्फ ​​नन्हू याचा भाऊ ग्यानी राम याचा मुलगा बलबीर याचा रहिवासी धनौरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com