esakal | देशात ३०५ लाख टन साखर उत्पादन शक्य; महाराष्ट्रात उत्पादन वाढणार 
sakal

बोलून बातमी शोधा

देशात ३०५ लाख टन साखर उत्पादन शक्य; महाराष्ट्रात उत्पादन वाढणार 

सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या उत्तर प्रदेशात ऊस लागवडीखालील क्षेत्रफळ २३.०७ लाख हेक्टर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत (२०१९-२०) त्यात किंचितशी घट झाली आहे.

देशात ३०५ लाख टन साखर उत्पादन शक्य; महाराष्ट्रात उत्पादन वाढणार 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - २०२०-२१ च्या गळीत हंगामात ३०५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज इस्मा या देशभरातील साखर कारखानदारांच्या संघटनेने व्यक्त केला. उपग्रहाद्वारे केलेल्या संरक्षणाच्या आधारे हा अंदाज काढण्यात आला असून यात इथेनॉल उत्पादनासाठी संभाव्य १५ लाख टन उसाचा उपयोग वगळला आहे. तसेच महाराष्ट्रात वाढीव ४६.३४ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. 

‘इस्मा’च्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक होऊन त्यात हा अंदाज व्यक्त करण्यात आला. या बैठकीला साखर उत्पादक राज्यांचे प्रतिनिधीही हजर होते. साखर उतारा, मान्सूनचा परिणाम, जलसाठ्यांमधील उपलब्धता याआधारे ऊस उत्पादनाचा आढावा घेण्यात घेण्यात आला. देशभरातील उसाचा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उपग्रहाद्वारे आढावा घेतल्यानंतर आढळून आले आहे, की यंदाच्या गळीत हंगामासाठी ५२.६८ लाख हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली असून मागील हंगामाच्या तुलनेत ९ टक्क्यांनी अधिक आहेत. मागील वेळी ऊस लागवडीखालील क्षेत्र ४८.४१ लाख हेक्टर होते. सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या उत्तर प्रदेशात ऊस लागवडीखालील क्षेत्रफळ २३.०७ लाख हेक्टर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत (२०१९-२०) त्यात किंचितशी घट झाली आहे. मागील वर्षी हे क्षेत्र २३.२१ लाख हेक्टर होते. परिणामी साखर उत्पादनतही घट होण्याची चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशात यंदा (२०२०-२१) १२४.५७ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. मागील वर्षी उत्तर प्रदेशातून १२६.३७ लाख टन उत्पादन झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रामध्ये मात्र दमदार पावसाच्या हजेरीमुळे ऊस लागवडीखालील क्षेत्र ४८ टक्क्यांनी वाढले आहे. २०१९ -२० मध्ये ७.७६ लाख हेक्टर असलेले क्षेत्र यंदा ११.४८ लाख हेक्टरवर पोचले आहे. मागील वर्षी पुरामुळे सुमारे ५० हजार हेक्टरवरील उसाचे नुकसान होऊनही राज्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. महाराष्ट्रात साखर उत्पादन १०८.०२ लाख टन होईल असा इस्माचा अंदाज आहे. मागील वर्षी साखर उत्पादन आकडेवारी ६१.६८ लाख टन होते. त्यात तब्बल ४६.३४ लाख टनांची वाढ अपेक्षित आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कर्नाटकमध्ये लागवडीखालील क्षेत्रात वाढ 
कर्नाटकमध्ये देखील ऊस लागवडीखालील क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत १९ टक्क्यांनी वाढले असून ५.०१ लाख टन झाले आहे. यामुळे मागील वर्षीच्या ३४.९६ लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत ४६.०४ लाख टन असे वाढीव साखर उत्पादन अपेक्षित आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तमिळनाडूत घट होण्याची शक्यता 
तमिळनाडूमधील साखर उत्पादन मात्र ३९ हजार टनांनी घटण्याचा म्हणजेच ७.५१ लाख टन उत्पादन होण्याचा इस्माचा अंदाज आहे. गुजरातमध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्र १.८७ लाख हेक्टरवरून २.०१ लाख हेक्टर वाढले आहे. परिणामी ९.३२ लाख टनांवरून १०.८१ लाख टन असे वाढीव साखर उत्पादन अपेक्षित आहे. उसाच्या या उपलब्धतेच्या आधारे यंदा ३३०.२३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज असल्याचे ‘इस्मा’चे म्हणणे आहे.

loading image