बाळाला स्तनपान करत असताना डोळा लागला अन्...

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

तीन महिन्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना मातेला चुकून डोळा लागला अन्...

आग्रा (उत्तर प्रदेश) : तीन महिन्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना मातेला चुकून डोळा लागला अन् मातेच्या अंगाखाली गुदमरून चिमुकल्याचा मृत्यू झाला. हृदय पिळवून टाकणारी घटना मालौनी गावात घडली आहे.

सरिता सिंह ही माता आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला एका कुशीवर झोपून स्तनपान करत होत्या. यावेळी त्यांना काही वेळासाठी झोप लागली. झोपेतून जाग आली तेव्हा बाळ स्वतःच्याच अंगाखाली दबले गेल्याचे लक्षात आले. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. बाळाचा गुदमरून मृत्यू झाला.

बाळाची काहीच हालचाल होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सरिता जोरजोरात रडू लागल्या. आवाज ऐकून कुटुंबीयही घाबरले. बाळाची हालचाल होत नसल्याने कुटुंबिय सुद्धा घाबरले. कुटुंबियांनी बाळाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे कुटुंबियांसह गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three month old baby dies after buried under mother body at agra