‘हिज्बुल’च्या म्होरक्यासह तीन दहशतवादी ठार

जावेद मात्झी ः सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 30 June 2020

दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी सकाळी चकमकीत हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख म्होरक्यासह तीन दहशतवादी ठार झाले. त्या वेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. 

श्रीनगर - दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी सकाळी चकमकीत हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख म्होरक्यासह तीन दहशतवादी ठार झाले. 

काश्‍मीर पोलिस, लष्कर १९ राष्ट्रीय रायफल, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त पथकाने  अनंतनागमधील रुनीपुरा खुल खुलकोहर येथील परिसराला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली होती. त्या वेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलानेही त्यास प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना टिपले. यामध्ये हिज्बुलच्या दोडा जिल्ह्याचा म्होरक्या मसूदचाही समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, नेपाळमधून तालिबान आणि जैश -ए-मोहम्मद या संघटनांचे दहशतवादी घुसखोरी करण्याची माहिती मिळाल्यानंतर, बिहार पोलिसांच्या विशेष शाखेने बिहारमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दोडा जिल्हा दहशवादमुक्त 
जम्मू-काश्‍मीरचे पोलिस महासंचालक दिलबागसिंह यांनी मसूद ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मसूद हा दोडा जिल्ह्यातील एकमेव दहशतवादी शिल्लक होता. आता तो मारला गेल्याने जम्मू विभागातील हा जिल्हा पुन्हा दहशवादमुक्त झाला आहे, असे दिलबागसिंह म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three terrorists including a Hezbollah leader were killed