esakal | जम्मू काश्मीर : तीन दहशतवाद्यांचा खात्मा, पाच जवान हुतात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

जम्मू काश्मीर : तीन दहशतवाद्यांचा खात्मा, पाच जवान हुतात्मा

जम्मू काश्मीर : तीन दहशतवाद्यांचा खात्मा, पाच जवान हुतात्मा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जम्मू विभागातील पूँछ जिल्ह्यात सोमवारी सकाळी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत लष्करातील सुभेदारासह पाच जवान हुतात्मा झाले. भारतीय लष्काराने 24 तासांत बदला घेत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मागील 24 तासांपासून भारतीय लष्काराने सर्च ऑपरेशन आधिक प्रभावीपणे करत दहशतवांद्याची पळती भुई थोडी केली आहे. येथील सर्च ऑपरेशन अद्याप सरुच आहे. मध्यरात्री शोपियानमध्ये भारतीय लष्काराने दहशतवाद्यांना घेरलं. जम्मू-काश्‍मीरमधील गेल्या २४ तासांतील ही तिसरी चकमक ठरली. उत्तर व दक्षिण काश्‍मीरमध्येही दोन चकमकी झाल्या.

चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. यातील एका दहशतवाद्याची ओळख गंदरबल (Ganderbal) येथील मुख्तार शाह अशी झाली आहे, ज्याने काही दिवसांपूर्वी बिहारमधील रस्त्यावर विक्रेता वीरेंद्र पासवानची हत्या केली होती. चकमकीत ठार झालेले तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले आहे. सध्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रांसह आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या या परिसरात आणखी शोध मोहीम सुरू आहे.

अन्य दोन चकमकीत दोन दहशतवादी ठार

यापूर्वी उत्तर काश्‍मीरमधील बंदीपुरा जिल्ह्यातील हाजीनच्या गुंडजहाँगिर भागात आज सकाळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. पोलिस व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त पथकाने हाजीन परिसर ताब्यात घेऊन शोध मोहिमेला सुरूवात केली. संशयित ठिकाणाकडे जाणाऱ्या शोध पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्त्युत्तर देताना एक दहशतवाद्याला सुरक्षा दलाने ठार केले. दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील खागुंड भागात आणखी एका चकमकीत एक दहशतवादी मारला गेला तर एक पोलिस जखमी झाला.

पाच जवान हुतात्मा -

चामरेर जंगलात संशयित दहशतवादी दिसल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिल्यानंतर लष्कर व पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसराला घेराव घालून दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेथे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठ्यासह तीन-चार दहशतवादी लपले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्याचा पुरावा मिळाल्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांचा पाठलाग केला. सुरक्षा दलाचे पथक जवळ येत असल्याचे पाहून झाडांमागे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्याला संयुक्त पथकाने जशास तसे उत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत लष्करातील सुभेदार जसविंद सिंग यांच्यासह जवान मनदीप सिंग, गज्जन सिंग, सरज सिंग आणि वैशाख (पूर्ण नाव समजलेले नाही) यांना वीरमरण आले तर एक दहशतवादीही ठार झाला. या घटनेनंतर संयुक्त पथकाने शोध मोहीम अधिक वेगाने सुरू केली. दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून तेथील परिसराला घातलेला वेढा मजबूत करण्यात आला. गेल्या आठवड्यात सीमेपलीकडून घुसखोरी हे दहशतवादी काश्‍मीरमध्ये पोचले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

loading image
go to top