
नवी दिल्ली : ‘‘शेजारी देशांशी संबंध कायम सुरळीत राहतीलच, असे अपेक्षित करता येत नाही. मात्र, भारतात कोणतेही सरकार सत्तेत असो, या संबंधांमध्ये स्थैर्य टिकवण्यासाठी सामूहिक हितसंबंधांची पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला आहे,’’ असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. ‘डीडी इंडिया’ तर्फे आयोजित संवादात ते बोलत होते. या संवादाची लिंक त्यांनी ‘एक्स’वर शेअर केली आहे. सामारिक तज्ज्ञासोबत त्यांनी संवाद साधला.