
भारतात मोजकेच वाघ शिल्लक आहेत, त्यातही त्यांच्या वाढलेल्या मृत्यूच्या घटना आपल्याला चिंतेत टाकणाऱ्या आहेत. त्यामुळेच, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कॉर्बेट टायगर रिझर्व्हमध्ये स्थापन केल्या जाणाऱ्या व्याघ्र सुरक्षा दलामध्ये (Tiger Protection Force) उत्तराखंडच्या अग्निवीरांची थेट नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा केली.