
उमरिया (मध्यप्रदेश) (पीटीआय) : व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन अर्थात टायगर सफारीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सुट्यांच्या हंगामात बहुतांश पर्यटकांची पावले जंगलांकडे वळतात. भविष्यामध्ये बांधवगड व्याघ्र प्रकल्पात काहीशी वेगळी स्थिती पाहायला मिळेल. येथे वाघांसोबतच जंगली हत्तींचाही संचार दिसेल. अन्य राज्यांतून येथे आलेले जंगली हत्ती आता माणसाळल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.