
ITR साठी उरले काही तास, अर्थ मंत्रालयाने सांगितले तारीख वाढणार नाही
नवी दिल्ली : आयकर भरण्यासाठी आज शेवटचा दिवस असून प्राप्तिकर भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल आहेत. प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 हीच असून, यात बदल करण्याचा सध्यातरी कोणतीही योजना नसल्याचे अर्थ मंत्रालयातर्फे शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे.
31 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 5.62 कोटी आयकर रिटर्न दाखल करण्यात आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 60 लाख अधिक रिटर्न भरले गेले आहेत. 30 डिसेंबर 2020 अखेरपर्यंत केवळ 4.83 कोटी रिटर्न भरले गेले होते, तर यावर्षी 30 डिसेंबरपर्यंत 5.43 कोटी रिटर्न भरले गेले आहेत. कोरोना महामारीमुळे, गेल्या वर्षी 31 डिसेंबर 2021 पर्यंतच आयकर रिटर्न भरले गेल्याची माहिती महसूल सचिव तरुण बजाज यांनी दिली.
भरावा लागेल 5000 पर्यंत दंड
आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर असून रात्री बारा वाजेपर्यंतच रिटर्न भरता येणार आहे. यानंतर, रिटर्न भरण्यासाठी 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. तुम्हाला 5000 रुपयांचा दंड टाळायचा असेल तर तुमच्याकडे रिटर्न भरण्यासाठी काही तास आहेत. मात्र, ज्यांची कमाई 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना फक्त 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.
Web Title: Till 3 Pm 562 Crore Returns Have Been Filed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..