रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ३८ रुपयांना तिरंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tiranga

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ३८ रुपयांना तिरंगा

नवी दिल्ली - ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, त्याचे पैसे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्यात येईल. प्रतिध्वज ३८ रुपये एवढी रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होणार आहे. याला रेल्वे कर्मचारी संघटनेने मात्र विरोध केला आहे.

“रेल्वे कर्मचाऱ्यांना जो ध्वज देण्यात येईल, त्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३८ रुपये कापले जातील, असा आदेश जारी करण्यात आला आहे,”, अशी माहिती रेल्वेचे सीपीआरओ शिवम शर्मा यांनी दिली आहे. तर “हा ध्वज कर्मचारी लाभ निधीतून दिला जात आहे. त्याचे पैसे नंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्यात येतील आणि ही रक्कम कर्मचारी लाभ निधीमध्येच हस्तांतरित केली जाईल. त्यामुळे पगारातून पैसे कापले जाऊ नयेत,” अशी प्रतिक्रिया रेल्वेचे विभागीय मंत्री चंदन सिंह यांनी दिली आहे.

१५ ऑगस्ट २०२२ रोजी भारत आपला ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमही त्याचाच एक भाग आहे. हेच राष्ट्रध्वज टपाल कार्यालयामार्फतही विकले जात आहेत. टपाल कार्यालयात २५ रुपयांना, तर बचत गटामार्फत २० रुपयांना राष्ट्रध्वज उपलब्ध होणार आहे.

Web Title: Tiranga For Railway Employees At Rs 38 Opposition To Employee Union Due To Coercion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..