Tirupati Balaji: ‘तिरुपती’चे चार कर्मचारी धर्मावरुन निलंबित; देवस्थानचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक
Balaji Mandir: देवस्थानच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले, की या कर्मचाऱ्यांनी हिंदू धार्मिक संस्थेमध्ये काम करत असताना संस्थेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले असून, त्यांनी आपली जबाबदारी दुर्लक्षित केली.
तिरुपतीः श्री वेंकटेश्वर मंदिराचे अधिकृत विश्वस्त मंडळ असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानने अन्य धर्म आचरण केल्याच्या आरोपांवरून चार हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, असे अधिकृत प्रसिद्धिपत्रकात शनिवारी सांगण्यात आले.