Viral Video: गाडीत शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने तिरूपती बालाजीला प्रवेश नाकारला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balaji And Shivaji Maharaj

Viral Video: गाडीत शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने तिरूपती बालाजीला प्रवेश नाकारला?

अमरावती (आंध्रप्रदेशची राजधानी) : आंध्रप्रदेशमधील तिरूपती तिरूमला बालाजी मंदिरात देशभरातून भक्तांची रीघ लागलेली असते. पण ज्या गाडीत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असेल अशा गाड्यांना तिरूमला देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांकडून अडवण्यात येत असल्याचा धक्कादायक दावा महाराष्ट्रातील एका भाविकाने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Tirumala Tirupati Balaji And Chhatrapati Shivaji Maharaj Controversy)

तिरूमला मंदिराच्या चेक पोस्टवर ही वाहने अडवण्यात येत असल्याची माहिती सदर व्यक्तीने दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती गाडीतून काढून टाका अन्यथा पुढे जाऊ दिले जाणार नाही असं बालाजी मंदिराच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचा दावा सदर व्यक्तीने केला आहे.

या घटनेनंतर अनेकांकडून मंदिरावर आक्षेप घेतले जात असून देवस्थानाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या मुर्त्यावर बंदी घातली तर आम्ही महाराष्ट्रीतल लोकं तिथे येणार नाहीत अशा शब्दांत रोष व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर यासंबंधी देवस्थानाला विचारले असता त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गाडीमध्ये मुर्ती, फोटो, राजकीय निशाणी असलेल्या वाहनांवर एका दशकांपूर्वी बंदी घातल्याचं स्पष्टीकरण देवस्थानने दिलं आहे. अडवलेल्या गाडीतील मुर्ती शिवाजी महाराजांची असल्याचं समजताच त्या गाडीतील भाविकांना प्रवेश देण्यात आला आहे. पण असून सदर भाविकाने केलेले आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण बालाजी देवस्थानने दिलं आहे.

Web Title: Tirupati Balaji Temple Shivaji Maharaj Idol Vehicle Access Denied

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top