TMC Candidate List 2024: लोकसभेसाठी TMC ची यादी जाहीर...क्रिकेटपटू युसूफ पठाणला बहरामपूरचे तिकीट तर नुसरत जहाँचा पत्ता कट

Loksabha election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीच्या जागावाटपावरून सुरू असलेला गोंधळात टीएमसीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024esakal

Loksabha Election 2024

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीच्या जागावाटपावरून सुरू असलेला गोंधळात टीएमसीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

तृणमूल काँग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्व 42 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणच्या नावाचाही समावेश आहे. युसूफ पठाण बहरामपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. युसूफ पठाण यांचा सामना काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे. पक्षाच्या नेत्या महुआ मोईत्रा यांचा समावेश आहे.

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेच्या 42 जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.

त्यांनी सांगितले की, आसनसोलमधून लोकसभेसाठी टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा असतील. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे... त्यासोबतच आसाम आणि मेघालयमध्येही निवडणूक लढवणार आहे.

युसूफ पठाण यांच्याशिवाय अन्य 41 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. ज्यामध्ये कांठी येथील उत्तम बारीक, घाटल येथील अभिनेते देब, झारग्रामचे पद्मश्री कालीपदा सोरेन, मेदिनीपूरचे जून मालिया, पुरुलियाचे शांती राम महतो, बांकुरा येथील अरुप चक्रवर्ती, वरदमन दुर्गापूर- कीर्ती आझाद, बीरभूमचे शताब्दी रॉय, बिष्णुपूरचे सुदाता मंडल खान, विष्णुपूरचे सुदाता मंडल खान यांचा समावेश आहे.

याशिवाय दमदममधून सौगता रॉय, बारासातमधून काकोली घोष दस्तीदार, बशीरहाटमधून हाजी नूरुल इस्लाम, जयनगरमधून प्रतिमा मंडल, मथुरापूरमधून बापी हलदर, डायमंड हार्बर- अभिषेक बॅनर्जी, जाधवपूरमधून शायनी घोष, कोलकाताहून मामा रॉय, दक्षिणेतून सुदीप रॉय. कोलकाता उत्तर बंधोपाध्याय, हावडा येथून प्रसून बॅनर्जी फुटबॉलपटू, उलुबेरियातील साजदा अहमद, श्रीरामपूर येथील कल्याण बॅनर्जी, हुगळीमधून रचना बॅनर्जी, आरामबागमधून मिताली बाग आणि तमलूकमधून देबांशू भट्टाचार्य यांना तिकिटे मिळाली आहेत.

Loksabha Election 2024
India FTA : देशात येणार 100 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक अन् 10 लाख रोजगार.. EFTA ग्रुपसोबत भारताने केला मुक्त व्यापार करार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com