Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या; तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागणी, अब्दुल्लांची चर्चा
Kashmir Politics : तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची भेट घेतली.
श्रीनगर :जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या (एनसी) मागणीला काश्मीर दौऱ्यावर आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पाठिंबा दिला. स्थानिक सरकार पूर्णपणे सक्षम असले पाहिजे असे, ते म्हणाले.