Pathaan Controversy : 'भगवा' भाजपची खासगी मालमत्ता आहे का? बिकिनी वादात TMCचा हल्लाबोल

tmc leader riju dutta slams bjp over pathaan bikini controversy besharam rang song
tmc leader riju dutta slams bjp over pathaan bikini controversy besharam rang song Esakal

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्याला देशभरात तीव्र विरोध होत आहे. हे गाणे रिलीज झाल्यापासून भाजप आणि इतर हिंदू संघटना याला विरोध करत आहेत. गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप दीपिका पदुकोणवर होत आहे.

आता या वादात टीएमसी नेते रिजू दत्ता यांनीही उडी घेतली आहे. भगवा रंग ही भाजपची वैयक्तिक मालमत्ता आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी स्मृती इराणी, लॉकेट चॅटर्जी आणि मध्य प्रदेशातील भाजप नेत्यांवरही हल्ला चढवला आहे.

टीएमसी नेते रिजू दत्ता यांनी 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्याबाबत सुरू असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. भगवा रंग ही भाजपची वैयक्तिक मालमत्ता आहे का? त्यांना यावर अधिकार कोण देतो? दीपिका पदुकोणसारख्या महिलांना त्यांच्या आवडीचे भगवे रंगाचे कपडे परिधान केल्याबद्दल शिवीगाळ करत असतील तर त्यांच्या एका केंद्रीय मंत्र्याने 1998 मध्ये 'भगव्या रंगाची' बिकिनी घातली होती हेही पाहावे. असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

यादरम्यान टीएमसी नेत्याने मागणी केली की, दिलीप घोष यांनी जेव्हा ममता बॅनर्जींना त्या बर्म्युडा (शॉर्ट्स) घालतात असे म्हणत शिवीगाळ केली तेव्हा त्यांनी कान धरून माफी मागितली होती का? त्यांचा दांभिकपणा थांबवावा. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबतच प्रज्ञा ठाकूर यांनीही कान पकडून दीपिका पदुकोणची माफी मागावी. टीएमसी नेत्याने प्रज्ञा ठाकूर यांनाही दहशतवाद आरोपी असं म्हटलं आहे.

tmc leader riju dutta slams bjp over pathaan bikini controversy besharam rang song
PNB Fraud Case : नीरव मोदीचं होणार प्रत्यार्पण! दोषी ठरल्यास किती वर्षांची होईल शिक्षा?

टीएमसीचे प्रवक्ते रिजू दत्ता यांनीही भाजप नेते लॉकेट चॅटर्जी यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना 'सुसंस्कृत ब्राह्मण' म्हणणाऱ्या पक्षाशी ती संबंधित असल्याचे रिजू दत्ता यांनी सांगितले. तर, मी अशा पक्षाशी संबंधित आहे ज्याच्या मुख्यमंत्री देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. यासोबतच देशातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीकही आहे. महिलांचा आदर कसा करायचा हे आपल्याला माहीत आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची खिल्ली उडवत रिजू दत्ता म्हणाले की, त्यांनी काय परिधान केले यावर टीएमसीला आक्षेप नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण आम्ही भाजपच्या मॉरल पोलिसिंगला आणि ठराविक लोकांवरील निवडक आक्रोशाचा विरोध करतो असे म्हटले आहे.

tmc leader riju dutta slams bjp over pathaan bikini controversy besharam rang song
Pathan Movie : हिंदुत्वचा अपमान करणारी कोणतीच 'फिल्म' चालू देणार नाही; 'पठाण' वादावर राम कदमांचा थेट इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com