"झोला लेके आये थे..."; संसदेतील व्हायरल व्हिडिओनंतर महुआ मोईत्रांचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर

tmc MP mahua moitra responds after video of hiding louis vuitton bag goes viral
tmc MP mahua moitra responds after video of hiding louis vuitton bag goes viral

लोकसभेच्या सत्रादरम्यान महागडी बॅग लपवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (tmc MP mahua moitra) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. टीएमसीच्या काकोली घोष दस्तीदार यांनी लोकसभेत महागाईचा मुद्दा उपस्थित करताच मोईत्रा यांनी त्यांची महागडी लुई विट्टोन बॅग लपवल्याचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता.

दरम्यान महुआ मोईत्रा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा बनला, या व्हिडीओवर अनेकांकडून कमेंट करत मोईत्रा यांच्यावर टीका देखील केली. दरम्यान आता, मोईत्रा यांनी त्याचा एक फोटो कोलाज ट्विट करून ट्रोल्सना प्रत्युत्तर दिले आहे.

मोईत्रा यांनी ट्विटरवर स्वत:चे अनेक फोटोंचा एक फोटो कोलाज शेअर केला आहे. सर्व फोटोंमध्ये त्या वेगवेगळ्या अनेक प्रसंगी लुई व्हिटॉन टोट बॅग घेऊन जाताना दिसत आहेत. त्यांनी ट्वीट केलेल्या फोटोसोबत कॅप्शन लिहीलं आहे, त्यांनी म्हटलं आहे की, "२०१९ सालपासून संसदेत झोलेवाला फकीर. झोला लेके आये थे... झोला लेके चल पडेंगे.."

tmc MP mahua moitra responds after video of hiding louis vuitton bag goes viral
महागाईवरच्या गदारोळात महुआ मोईत्रांनी हळूच लपवली दोन लाखांची बॅग

टीएमसी खासदार मोईत्रा यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी हे ट्वीट केले आहे. त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काकोली घोष दस्तीदार या लोकसभेत बोलत आहेत आणि मोईत्रा त्यांच्या शेजारीच बसल्या आहेत. दस्तीदार यांनी भाववाढीचा मुद्दा उपस्थित करताच मोईत्रा यांनी पटकन त्यांची लुई व्हिटॉनची बॅग टेबलाखाली सरकवल्याचे या मध्ये दिसत आहे. त्यानंतर हा सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा बनला.

लोकसभेच्या सत्रादरम्यान, महागाईवर, दरवाढीवर चर्चा सुरू होती. त्यांच्याच शेजारी उभ्या राहून खासदार ककोली घोष दस्तीदार या तावातावाने महागाईबद्दल बोलत होत्या. दरम्यान, शेजारीच बसलेल्या महुआ मोईत्रा यांनी आपली महागडी बॅग हळूच पायाखाली सरकवली.

लुई विट्टोन हा फ्रेंच लक्झरी ब्रँड आहे आणि व्हायरल व्हिडिओमध्ये मोहुआ मोइत्रा यांची जी बॅग दिसत आहे त्याची किंमत अंदाजे 2 लाख रुपये इतकी आहे.

tmc MP mahua moitra responds after video of hiding louis vuitton bag goes viral
राऊतांच्या अडचणी वाढणार? ईडीची मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com