होय, दोन भारत आहेत!

आपल्याकडे ‘दोन भारत' आहेत, असे विनोदी कलाकार वीर दास त्याच्या खास शैलीत म्हणत असला तरी, पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून त्याची खरोखरच प्रचिती आली आहे.
Worker
Workersakal

- टी. एन. नैनन

आपल्याकडे ‘दोन भारत' आहेत, असे विनोदी कलाकार वीर दास त्याच्या खास शैलीत म्हणत असला तरी, पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून त्याची खरोखरच प्रचिती आली आहे. तमिळनाडूकडे पाहिल्यावर दिसणाऱ्या भारतात, बिहारकडे पाहिल्यावर दिसणाऱ्या भारताच्या तुलनेत एक तृतीयांशापेक्षा कमी अतिसाराचे रुग्ण आहेत. तेथे बालकांचा मृत्यूदर ४० टक्के आणि प्रजनन दर ६० टक्के आहे. त्याचवेळी बिहारमध्ये तमिळनाडूच्या तुलनेत साक्षर महिलांचे प्रमाण केवळ दोन तृतीयांश आहे किंवा एक हजार लोकांमागे एकच डॉक्टर दिसून येतो. अशा स्थितीत अविकसित आणि कुपोषित बालकांचे प्रमाण मात्र ५० टक्कयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले आहे.

एवढा विरोधाभास असूनही जेव्हा वीज आणि पिण्याचे पाणी (९५ टक्के आणि १०० टक्के) असलेल्या घराचा विचार होतो तेव्हा दोन्ही राज्ये एकाच भारतात असल्याचे ठळकपणे दिसतात. बँक खातेधारक महिलांचा विचार होतो तेव्हा अन्य क्षेत्रांच्या तुलनेत दोन्ही भारतातील हा फरक खूपच कमी (तमिळनाडूत ९२ टक्के आणि बिहारमध्ये ७७ टक्के) दिसून येतो. अर्थात सर्वच पातळीवरचे लोक अधिकाधिक प्रमाणात तमिळनाडू नेतृत्व करणारा भारत पाहण्याची अपेक्षा बाळगून असतील. परंतु दोन्ही भारतातील प्रजननाचा विभिन्न दर पाहता असंख्य भारतीय हे बिहारच्या नेतृत्वाखालील भारतात राहतात की काय, असे वाटल्याशिवाय राहत नाही.

तमिळनाडूच्या भारतात बहुतांश दक्षिणेतील आणि पश्‍चिम भारत व हरियानासारख्या राज्यांचा समावेश होतो. या राज्यात दरडोई वार्षिक उत्पन्न सुमारे ३ हजार डॉलर आहे. हे प्रमाण लक्षणीय असून ते सकल उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा ७५ टक्के अधिक आहे. एकूण भारतीय नागरिकांचे दरडोई उत्पन्न हे नायजेरियाच्या तुलनेत थोडे कमी आहे. उत्पन्नाच्या तुलनेत तमिळनाडू फिलिपाईन्सजवळ आहे. देशाच्या एकूण दरडोई उत्पन्नाचा विचार करताना बिहारला समोर ठेवल्यास तेथील दरडोई उत्पन्न हे भारताच्या एक तृतीयांश आहे. याप्रमाणे उत्पन्नाच्या बाबतीत बिहारचा नंबर नायजेरियासमवेत लागू शकतो. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत २१५ देशांच्या यादीत नायजेरियाचे स्थान २०४ क्रमांकावर आहे. तसेच जगात नायजेरियातील मानव विकास निर्देशांक नीचांकी पातळीवर आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशची नायजेरियालगत असलेले देश साहेल, मालीशी तुलना करता येऊ शकेल.

Worker
Video: ग्राम सुरक्षा दलाच्या ६०० जागांसाठी उमेदवारांची तुडुंब गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज!

एकंदरीतच देशातील विविध राज्यांचे चित्र पाहता आपल्याकडे नक्कीच दोन भारत आहेत, याची खात्री पटते. कारण एक भाग आफ्रिकेतील साहेल क्षेत्राप्रमाणे आणि दुसरा भाग फिलिपिन्सप्रमाणे दिसतो. अशा दोन जगात राहणारा आणि दिसणारा भारत आपल्या अनुभवास येतो. म्हणूनच आर्थिक विकासाच्या दराची तुलना करण्यात काही अर्थ नाही. कारण राज्याच्या विकास दराबाबत करण्यात येणारे दावे हे राष्ट्रीय आकडेवारीपेक्षा अधिक बेभरवशाचे आहेत. फिलिपिन्सप्रमाणे वाटचाल करणारा भारत हा खासगी गुंतवणुकीत अग्रेसर आहे, परंतु साहेल देशाशी तुलना करणाऱ्या भारतात असे चित्र दिसत नाही. सध्या उत्तर प्रदेशातील खासगी गुंतवणुकीचे आणि प्रकल्पाचे वाढते प्रमाण पाहता सार्वजनिक गुंतवणुकीचे प्रमाण कमी होत आहे काय? असा प्रश्‍न आपल्या मनात नकळत येऊ शकतो. श्रीमंत राज्याच्या तुलनेत बिहारसारख्या राज्यांना केंद्राकडून दरडोई प्रमाणात येणारे अर्थसाह्य कमीच आहे. गरीब राज्यांकडे सरकारी खर्च भागवण्यासाठी कर हाच एकमेव स्रोत असताना, चांगल्या राज्यांकडे याच कराकडे भांडवल उभारणी म्हणून पाहिले जाते.

विशेष म्हणजे हे दोन्ही भारतांचा अवकाश एक असला तरी ते एकमेकांच्या जवळही फिरकत नसल्याचे दिसून येते. उत्तर प्रदेशात एक्स्प्रेस वे चे चांगले जाळे पसरलेले आहे. आता या जोडीला जेवारसारखा आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळही असेल, असा दावा उत्तर प्रदेशकडून केला जात आहे. परंतु राजधानी दिल्लीतील विमानतळांनी पूर्वीपासूनच जेवारच्या चौथ्या टप्प्यांतील प्रवासी क्षमता हाताळली आहे आणि आशिया खंडात यापेक्षा पाच मोठी विमानतळे अस्तित्वात आहेत. जगातील चौथ्या क्रमांकाची जागा पटकावण्यासाठी जेवार विमानतळ उभारणी केली जात असताना उत्तर प्रदेशमधील जमिनीचे केलेले अधिग्रहण हे राष्ट्रीय राजधानीतील विमानतळाच्या तुलनेत कमीच आहे.

Worker
Mann Ki Baat: नवा व्हेरियंट, कृषी कायदे; PM मोदी करणार उद्या देशाला संबोधित

शेवटी, समृद्ध राज्य हे एखाद्या सपाट असलेल्या क्रीडा मैदानासारखे असते आणि तेथे स्थलांतर करणे सोयीचे असते. कोरोना लॉकडाउनच्या काळात जेव्हा लाखो स्थलांतरित मजुर शेकडो किलोमीटरचा प्रवास करून स्वगृही आले, तेव्हा हीच बाब त्यांना प्रकर्षाने जाणवली. स्थानिक रोजगारांना प्राधान्य देण्याच्या नावाखाली परप्रांतीयांना काम देण्यास मनाई करणारे हरियानासारखे राज्य आपल्याकडे आहे. पण साहेल देशासारख्या भारतातील मजूर हे कमी पैशातही ओझी उचलण्यास तयार आहेत. परंतु अनेकदा हरियानाचे भूमिपुत्र परप्रांतीयांना स्वीकारण्यास तयार नसतात. ही मंडळी हरियानाचे दीपस्तंभ होऊ इच्छित आहेत, परंतु अडचणीची बाब अशी त्यांच्याकडे शिक्षणाचा अभाव आहे. इथेही दोन हरियाना आपल्याला दिसतील. जेव्हा दोन्ही भारत एकत्र ठेवतो, तेव्हा रोजगारर्निर्मितीला अडथळा येतो आणि अपेक्षेप्रमाणे आर्थिक विकास गाठता येत नाही. अशावेळी बिहारच्या कमी शिक्षित आणि अशक्त मजुरांनी राज्य न सोडता स्थानिक पातळीवरच काम करायचे ठरवले तर त्यांची अधिकच गोची होते.

(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.)

(अनुवाद : अरविंद रेणापूरकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com