
पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडणार; अमित शहांच्या उपस्थितीत फडकणार ७५ हजार राष्ट्रध्वज
पाटणा : बिहारमधील कुंवरसिंह विजयोत्सवात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एकाच वेळी ७५ हजार राष्ट्रध्वज फडकवले जाणार आहेत. याद्वारे पाकिस्तानचा विश्वविक्र मोडीत निघणार आहे. ५७,५०० राष्ट्रध्वज फडकवण्याचा विक्रम यापूर्वी पाकिस्तानच्या नावावर आहे. (to break Pakistan world record 75000 national flags will be flown in presence of Amit Shah)
हेही वाचा: "आज कार्यालयात घुसलो उद्या घराघरात घुसू"; आनंद दवेंचा राष्ट्रवादीला इशारा
सन १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामादरम्यान बाबू वीर कुंवर सिंह यांनी इंग्रजांवर विजय मिळवल्याचं स्मरण म्हणून विजयोत्सव साजरा केला जातो. यंदा साजरा होत असलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विजयोत्सवाला समर्पित करण्यात आला आहे. या विजयोत्सवाचं २३ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आलं असून याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थिती लावणार आहेत. जगदीशपूर येथील कुंवर सिंह यांच्या ऐतिहासिक किल्ल्यावर हा कार्यक्रम पार पडणार आहे.
हेही वाचा: मिटकरींच्या भाषणाविरोधात पुण्यात ब्राह्मण महासंघाचं आंदोलन
दरम्यान, अमित शहा यांच्या उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमात एकाच वेळी ७५ हजार राष्ट्रध्वज फडकावण्यात येणार आहेत. याद्वारे नवा विश्वविक्रम नोंदवण्यात येणार आहे. यापूर्वी एकाच वेळी ५७,५०० राष्ट्रध्वज फडकवण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे.
इंग्रजांवरील विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी केलं जात आयोजन
सन १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामादरम्यान बिहारचे तत्कालीन जमीनदार बाबू वीर कुंवर सिंह यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडलं होतं. त्यांनी काही दिवस आपलं संस्थानही इंग्रजांपासून स्वतंत्र करण्यातही यश मिळवलं होतं. इंग्रजांसोबत लढताना जखमी झाल्यानंतर काही वेळानंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. त्यामुळं इंग्रजांवर मिळवलेल्या विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी जगदीशपूर इथं हा विजयोत्सव साजरा केला जातो.
Web Title: To Break Pakistan World Record 75000 National Flags Will Be Flown In Presence Of Amit Shah
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..