"ब्रँड तयार करताना स्वतः झिजावं लागतं", व्हिडिओ शेअर करत वसंत मोरेंचा संदेश : Vasant More | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant More

Vasant More: "ब्रँड तयार करताना स्वतः झिजावं लागतं", व्हिडिओ शेअर करत वसंत मोरेंचा संदेश

पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे विविध कारणांसाठी कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून त्याला मार्मिक कॅप्शनही दिलं आहे. त्यांच्या या कॅप्शनची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. (To build a brand we have to dwindle MNS Vasant More gives message with sharing a video)

वसंत मोरे यांनी एका चहाच्या दुकानातला व्हिडिओ शेअर केला आहे. या दुकानात ते स्वतः चहा बनवत आहेत. सासवड रोडवरील बोपदेव घाटातला हे चहाचं दुकान असून या ठिकाणी जेवणंही चांगलं मिळतं असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

"ब्रँड तयार करायचा म्हंटलं ना की स्वतः झिजाव लागतं" अशी कॅप्शन मोरे यांनी या व्हिडिओला दिली आहे. त्यामुळं त्याची सोशल मीडियावर राजकीय चर्चा देखील सुरु झाली आहे.

टॅग्स :mnsDesh newsVasant More