#MadrasDay 'मद्रास ही भावना'; शहराला झाली 380 वर्षे पूर्ण!

टीम ईसकाळ
Thursday, 22 August 2019

1996 मध्ये या शहराचे नाव मद्रासवरून चेन्नई करण्यात आले होते. 'मद्रास दिवसा'निमित्त आज ट्विटरवर #MadrasDay हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. 

चेन्नई : तमिळनाडूची राजधानी असलेल्या मद्रासचा आज वाढदिवस! चेन्नई म्हणजेच पूर्वीच्या मद्रास या शहाराला आज 380 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त आज (ता. 22) 'मद्रास दिवस' साजरा केला जातो. 1996 मध्ये या शहराचे नाव मद्रासवरून चेन्नई करण्यात आले होते. 'मद्रास दिवसा'निमित्त आज ट्विटरवर #MadrasDay हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. 

बंगालच्या उपसागरावर वसलेल्या मद्रासला 380 वर्षांचा सुंदर असा इतिहास आहे. चेन्नई हे मोठे सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे. तसेच आता आयटी हब म्हणूनही चेन्नई नावारूपास येत आहे. 

 

पर्यटनासाठीही चेन्नई प्रसिद्ध आहे. येथील मरिना बीच ही सर्वात मोठी चौपाटी समजली जाते. मद्रासने अनेक दिग्गज देशाला दिले आहेत. 

 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today is the 380th birth anniversary of Madras