देशभरात टोल दर समान - गडकरी

तमिळनाडूत इतर राज्यांपेक्षा वेगळा व जास्त टोल आकारला जातो
Toll rates are same across country nitin Gadkari
Toll rates are same across country nitin Gadkari

नवी दिल्ली - राष्ट्रीय महामार्गांवर देशभरात एकच टोल दर आकारला जातो, असे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. तमिळनाडूत इतर राज्यांपेक्षा वेगळा व जास्त टोल आकारला जातो, या मुद्यावर द्रमुक खासदार कनिमोझी एनव्हीएन सोमू यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात गडकरी यांनी, टोल नाक्यांवर आकारल्या जाणाऱया पैशातून रस्ते निर्मितीचे काम पुढे सुरू रहाते, असे सांगितले.

राज्यसभेत महागाईवरील मुद्यावरून आजही पूर्वार्धात जोरदार गदारोळ झाला. काहीही झाले तरी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करणार नाही अशी ठाम भूमिका सरकारने घेतली. त्यामुळे एकाच वेळी विरोधकांची घोषणाबाजी व प्रश्नांना मंत्री देत असलेली उत्तरे, असे चित्र दिसले. संपूर्ण तासभर विरोधक ‘मोदी सरकार शरम करो‘ यासारख्या गगनभेदी घोषणा देत होते व भाजप सदस्य-मंत्री कामकाजात सहभागी झाले होते.

महागाईच्या मुद्यावर सरकार चर्चेला तयार आहे मात्र त्यासाठी सारे कामकाज स्थगित करण्यास सरकारची तयारी नाही असे सभागृहनेते पियूष गोयल यांनी स्पष्ट केले. अर्थमंत्र्यांना कोरोना झाला आहे तरीही सरकार महागाईवरील चर्चेला तयार आहे. विरोधकांना मात्र गोंधळच घालायचा आहे असा आरोप सरकारच्या वतीने करण्यात आला.विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी, नियम १७६ नव्हे तर नियम २६५ अंतर्गतच चर्चा आम्हाला हवी, असा आग्रह धरल्याने कामकाज सुरळीत चालण्याचे मार्ग खुंटला. दुपारी मात्र सदस्यांच्या खासगी विधेयकांवरील चर्चा सुरळीत सुरू राहिली.

दरम्यान गडकरी यांनी सोमू यांच्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले की राष्ट्रीय महामार्गांवर देशभरात टोल कर एकसमान कारले जातात. सोमू यांच्या म्हणण्यानुसार तमिळनाडूतील दहा वर्षांपूर्वीच्या टोल नाक्यांवरील टोलचे दर नुकतेच परस्पर वाढविण्यात आले. फक्त याच राज्यात राष्ट्रीय महामार्गांवरील टोलचे दर इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत. असे का होते ? असा त्यांचा सवाल होता. तमिळनाडूत असे घडत आहे का, याची माहिती आपण घेऊ असे सांगून गडकरी म्हणाले की तमिळनाडूसह साऱया देशातील टोल दर समान आहेत. त्यावर जमा झालेल्या टोलच्या रकमेतून रस्त्यांची व महामार्गांची कामे सुरू ठेवली जातात.

‘अरब देशांबरोबरचे संबंध मजबूत'

राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांच्या ‘काही‘ वक्तव्यां व्यतिरिक्त, अरब देशांबरोबर भारताचे संबंध एतिहासिक असून आजही ते तेवढेच दृढ आहेत असे मोदी सरकारने सांगितले. स्ततारूढ भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल अनुद्गार काढल्याच्या प्रकरणानंतर येमेन व ओमानसह अनेक मुस्लिम देशांंनीही भारताकडे तीव्र प्रतीक्रिया नोंदवली होती. संबंधित विधाने एका व्य्कतीने दिली आहेत व त्यात भारताची भूमिका व पाठिंबा यांचा काहीही संबंध नाही असे आमच्या राजदूतांनी आखाती देशांच्या सरकारांना स्पष्ट केले होते. आपत्तीजनक वक्तव्याचा निषएध करणाऱयांत कतार, कुवेत, इराण, पाकिस्तान, इंडोनेशिया, मलेशिया, अजरबैजान आदी देशांचा समावेश असल्याचेही मंत्र्यांच्या विस्तारित उत्तरात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com