

Pune Ranked 2nd in India for Traffic Congestion in TomTom Traffic Index
sakal
Pune Ranked 2nd in India for Traffic Congestion: रस्त्यांची १२ महिने सतत चालू असलेली कामं, पावसाळ्यात पडणारे खड्डे, रस्त्याच्या बाहेर आलेली अन् फुटपाथवरची अतिक्रमणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाढती लोकसंख्या यामुळे पुण्यात ट्राफिक मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अलीकडे झालेल्या महानगरपालिका निवडणुकांदरम्यानही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली होती, तरी देखील पुण्यातील रस्त्यांवर हळूहळू वाहणारी वाहतूक अजूनही गंभीर समस्या ठरत आहे.
नेदरलँड्समधील लोकेशन टेक्नॉलॉजी कंपनी TomTomने नुकताच जाहीर केलेल्या Traffic Index 2025 अहवालानुसार, पुणे जगभरातील सर्वाधिक कोंडीत अडकलेल्या शहरांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, तर भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक टॉप-10 यादीतही भारतातील दुसऱ्या क्रमांकावर पुण्याचंच स्थान आहे.