Toolkit Case: खलिस्तानी समर्थकांच्या संपर्कात असलेली निकीता जेकब आहे तरी कोण?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 15 February 2021

, रिपब्लिक डेच्या आधी एक झूम बैठक झाली होती. यात धालीवाल याच्यासह अटक करण्यात आलेली क्लायमेंट ऍक्टिविस्ट दिशा रवी आणि निकिता जेकब यांचा समावेश होता

नवी दिल्ली- खलिस्तानी समर्थक संघटन पोएटिक जस्टिस फाऊंडेशनचा संस्थापक धालीवालने 26 जानेवारीला शेतकरी आंदोलनासंबंधी भडकाऊ हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडमध्ये आणण्यासाठी निकीता जेकबला संपर्क केला होता, अशी माहिती टूलकिट प्रकरणी तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, धालीवाल याने आपला सहयोगी पुनीत याला जेकबला संपर्क करण्यास सांगितले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, टूलकिट डॉक्युमेंट तयार केल्याप्रकरणी अनेकांना अटक केली जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

Toolkit Case: दिशा रवी आहे कोण? ग्रेटा थनबर्ग आणि तिचं काय कनेक्शन?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिपब्लिक डेच्या आधी एक झूम बैठक झाली होती. यात धालीवाल याच्यासह अटक करण्यात आलेली क्लायमेंट ऍक्टिविस्ट दिशा रवी आणि निकिता जेकब यांचा समावेश होता. या बैठकीचा उद्देश रिपब्लिक डे परेडच्या आधी ट्विटरवर ट्रेंड करण्याचा होता. या बैठकीदरम्यान एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची चर्चा झाली होती. चार दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांची एक टीम निकीताच्या घरी गेली होती. त्याठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स जॅझेट्स तपासण्यात आले होते. त्यानंतर निकीताची चौकशी केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं होतं, पण त्या दिवसापासून ती बेपत्ता आहे. सोमवारी दिल्ली पोलिसांनी तिला फरार घोषित केलं आहे. 

टूलकिटप्रकरणी क्लायमेट ऍक्टिविस्ट दिशा रविच्या अटकेनंतर निकिता जेकब आणि शांतनुविरोधात दिल्ली पोलिसांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे. निकिता जेकबला दिल्ली पोलिसांनी फरार घोषित केलं आहे. दुसरीकडे निकीताने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. निकीता कोर्टात हजर राहील, असं तिच्या वकीलांनी सांगितलं आहे.

सुप्रीम कोर्ट म्हणालं 'व्हॉट्सअ‍ॅप', चिटिंग करणार नाही लिहून द्या!

काही दिवसांपूर्वी ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाप्रकरणी सोशल मीडियावर एक टूलकिट शेअर केलं होतं. त्यानंतर तिने ते टूलकिट डिलिट केलं, पण याच प्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी दिशा रविला अटक केलीय. दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम यूनिटने शनिवारी दिशा रवीला तिच्या बेंगळुरी स्थित घरुन अटक केली होती..

निकीता जेकब कोण आहे?

निकीता जेकब मुंबई हाय कोर्टात वकील आहेत. त्या सामाजिक न्याय आणि पर्यावर संरक्षण प्रकरणांमध्ये स्वयंस्फुर्तीने काम करतात. त्यांनी ट्विटरवरील बायोमध्ये लिहिलंय की, चुकीच्या विरोधात आवाज उठवण्यास त्यांना आवडतं. त्या कॅथोलिक आहेत. ग्रेटा थनबर्गने शेअर केलेल्या टूलकिटप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांचं नाव घेतलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: toolkit matter Dhaliwal Poetic Justice Foundation founder contacted Nikita Jacob