नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये भरपूर गाजावाजा आणि वातावरण निर्मिती केल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पाठ फिरविल्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे राजधानी दिल्लीतील संभाव्य शक्तिप्रदर्शन फारसे झालेच नाही.