
अमरावती (आंध्रप्रदेश) : छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राव जिल्ह्यात पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य व कुख्यात नक्षली नेता गजर्ला रवी ऊर्फ उदय, नक्षली कमांडर रावी वेंकटा चैतन्या ऊर्फ अरुणा आणि अंजू असे तिघे ठार झाले आहेत. अरुणा ही कुख्यात माओवादी चलपतीची पत्नी होती.