काश्मीरमध्ये 'लष्करे तैयबा'चा प्रमुख दहशतवादी ठार 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

काही दिवसांपूर्वी आसिफने सोपोरमधील एका फळ विक्रेत्याच्या कुटुंबीयांवर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले होते. जखमींमध्ये आसमा जान नावाच्या एका लहान मुलीचाही समावेश होता. सोपोरमध्येच त्याने शफी आलम नावाच्या मजुरावरही गोळीबार केला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. 

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात आज (बुधवार) सुरक्षा रक्षकांना लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोर जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 'लष्करे तैयबा'चा टॉपचा दहशतवादी आसिफचा खात्मा करण्यात आला. लष्कराला मिळालेलं हे मोठे यश आहे. उत्तर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांना 'लष्करे तैयबा'चे टेरर मॉड्युल पकडण्यात यश आले. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोध अभियान राबविले. या कारवाईदरम्यान या संघटनेशी संबंधित 8 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी आसिफने सोपोरमधील एका फळ विक्रेत्याच्या कुटुंबीयांवर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले होते. जखमींमध्ये आसमा जान नावाच्या एका लहान मुलीचाही समावेश होता. सोपोरमध्येच त्याने शफी आलम नावाच्या मजुरावरही गोळीबार केला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: top ranking LeT terrorist Asif killed in an encounter in Sopore