
नवी दिल्ली : गंगा नदीतील आधीच धोक्यात असलेल्या ‘डॉल्फिन’च्या अस्तित्वाला नदीतील वाढत्या विषारी रसायनांच्या प्रदूषणामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. वेळीच प्रतिबंधक उपाय न केल्यास ते नामशेष होण्याची भीती आहे. ‘वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या संशोधनातून हे उघड झाले आहे.