Video: पोलिसांनी दंड केल्यावर भररस्त्यात ढसाढसा रडला...

वृत्तसंस्था
सोमवार, 2 डिसेंबर 2019

सोशल मीडियावर एका युवकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसावे की रडावे, हे कळेनासे झाले आहे. शिवाय, अनेकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून सल्लेही दिले आहेत.

मेरठ (उत्तर प्रदेश) : सोशल मीडियावर एका युवकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसावे की रडावे, हे कळेनासे झाले आहे. शिवाय, अनेकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून सल्लेही दिले आहेत.

एक युवक विना हेल्मेट दुचाकी चालवत होता. पोलिसांनी त्याला आडवल्यानंतर त्याला दंड केला. पोलिसांनी दंड ठोठावल्यामुळे युवकाला राग आला. भर रस्त्यात तो स्वत:चीच दुचाकी आपटत बसला. मात्र, काही वेळानंतर तो भानावर आला अन् ढसाढसा रडू लागला. यावेळी उपस्थितांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ कैद केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेटिझन्सनी व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. काहींनी आर्थिक मंदीचे कारण पुढे केले आहे, तर काहींनी पोलिसांनी आकारलेल्या दंडावर आक्षेप घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic police issued challan youth started crying bitterly video viral up