
झालावाड : सरकारी शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात विद्यार्थ्यांचा मृत्यू तर २८ जण जखमी झाले. ही घटना झालावाड जिल्ह्यातील पिपलोदी सरकारी शाळेत शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेबद्धल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला आहे.