
हैदराबाद : येथील प्रसिद्ध चारमिनारजवळ असलेल्या गुलजार हाउस क्षेत्रात लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वर्षीय बालक व सातवर्षीय बालिकेचाही समावेश आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बचावकार्य सुरू केले. इमारतीत अडकलेल्या काहीजणांना वाचविण्यात त्यांना यशही आले.