Bilaspur Bus Accident : हिमाचल प्रदेशात बसवर दरड कोसळून १५ जणांचा मृत्यू
Himachal Bus Accident : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील भालुघाट येथे जोरदार पावसामुळे खासगी बसवर दरड कोसळल्याने भीषण अपघात झाला असून, आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
सिमला : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात एका खासगी बसवर दरड कोसळल्याने १५ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात झंडूत्ता विधानसभा क्षेत्रातील भालुघाट भागात मंगळवारी (ता. ७) संध्याकाळी घडला, असे सांगण्यात आले.