तीनचाकी मोटारीतून करा हवाई प्रवास!

अमेरिकेत तीन चाकी ‘स्विचब्लेड’च्या चाचण्यांना परवानगी
Travel in air by three-wheeled car switchblade america life
Travel in air by three-wheeled car switchblade america life sakal

नवी दिल्ली : आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हा स्वतःच्या मोटारीतूनही हवाई प्रवास करता येणार आहे. यासाठी अमेरिकेच्या सॅमसन स्कायने अशी मोटार प्रायोगिक तत्त्वावर तयार केली आहे. विशेष म्हणजे ही मोटार चार नव्हे तर तीनचाकी आहे. जगातील पहिल्या उडणाऱ्या तीनचाकी स्पोर्ट्स मोटारीच्या (फ्लाइंग कार) चाचण्यांना अमेरिकेच्या ‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’कडून (एफएए) नुकतीच परवानगी मिळाली आहे. ‘स्विचब्लेड’च्या अनेक चाचण्या घेण्यात येणार आहेत. जमिनीवर सामान्य मोटारीप्रमाणे तर हवेत उड्डाण करूनही चाचण्या घेतल्या जातील. कंपनी गेल्या १४ वर्षांपासून या मोटारीवर संशोधन करीत आहे.

‘फ्लाइंग कार’ची वैशिष्ट्ये

  • प्रतितास ३२२ किलोमीटर वेगाने उडू शकते

  • तीन चाकांच्या मदतीने जमिनीवरही सहजपणे चालविता येणार

  • जमिनीवर वेग २०१ किमी प्रतितासापर्यंत नेता येणार

  • मोटारीची लांबी ५.१ मीटर व रुंदी १.८ मीटर आहे

  • घरातील गॅरेजमध्ये उभी करता येणे शक्य

  • हवेतून जमिनीवर उतरल्यानंतर चालविण्याच्या पद्धतीत तातडीने बदल करता येणार

हवाई उड्डाणासाठी

  • विमानतळावर नेल्यानंतर मोटारीचे पंख व शेपटाकडील भाग उघडता येणार

  • या प्रक्रियेसाठी केवळ तीन मिनिटे वेळ लागणार

  • पंख व शेपटामुळे सहजपणे आकाशात उडू शकेल

  • ११३ लिटरची इंधन टाकी

  • एकदा टाकी पूर्ण भरल्यानंतर ७२४ किलोमीटर अंतरापर्यंत जाण्यास सक्षम

  • टेकऑफचा वेग साधारपणे १४१ किमी प्रतितास असण्याचे अनुमान

  • जमिनीपासून हवेत मोटार ४ किमीपर्यंत उंची गाठू शकेल

कंपनीचे म्हणणे...

  • चाचणी होण्यापूर्वीच अमेरिकेतील ५० राज्यांसह ५२ देशांतील दोन हजार १०० लोकांकडून या अद्‍भूत मोटारीसाठी नोंदणी

  • नोंदणी करणाऱ्यांमध्ये ‘नासा’चे अभियंते, वैमानिक आणि अनेक उद्योजकांचा समावेश

  • चाचण्यांनंतर विक्रीसाठी मंजुरी मिळेल

  • स्विचब्लेड रस्त्यावर चालविण्यासाठी वाहन परवाना आणि हवेत उडविण्यासाठी वैमानिक परवाना आवश्‍यक

  • सार्वजनिक व खासगी विमानतळावरुन उड्डाण करता येणार

  • एका मोटारीच्या किटची किंमत साधारण साडे तेरा कोटी

  • किटमध्ये इंजिन, ट्रान्समिशन, एव्हियोनिक्स, इंटिरिअर आणि ‘सॅमसन बिल्डर असिस्ट प्रोग्रॅम’चा समावेश

  • ‘एफएए’ने प्रायोगिक/घरगुती या वर्गवारीत मोटारीचा समावेश केल्याने ग्राहकाने त्यांच्या वाहनाचा ५१ टक्के भाग किटच्या मदतीने तयार करणे आवश्यक

  • खरेदीनंतर मोटार बांधणीसाठी ‘सॅमसन बिल्डर असिस्टन्स सेंटर’ला भेट दिल्यानंतर ग्राहकाला मार्गदर्शन मिळणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com