मणिपूर दहशतवादी हल्यात वीरमरण आलेल्या कर्नलच्या चिमुकल्याला श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मणिपूर दहशतवादी हल्यात वीरमरण आलेल्या कर्नलच्या चिमुकल्याला श्रद्धांजली

मणिपूर दहशतवादी हल्यात वीरमरण आलेल्या कर्नलच्या चिमुकल्याला श्रद्धांजली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नई दिल्ली : मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ड्युटीवर असलेले शहीद कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्या कुटुंब आणि इतर 4 सैनिंकावर सोमवारी अंतिम संस्कार करण्यात आले. सोशल मिडियावर या अधिकाऱ्याची पत्नी अनुजा आणि 8 वर्षाचा मुलगा अबीर यांनाही श्रध्दांजली वाहिली. छत्तीसगढमध्ये त्यांच्या मुळ गावी रायगढ येथे संपूर्ण राज्य आणि लष्करी सन्मानाने पार पडलेल्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक उपस्थित होते. त्रिपाठी यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

लहानग्या अबीरला श्रध्दांजली देताना सोशल मीडियावर लोकांनी त्यांच्या कास्केटचे फोटो शेअर करत ''जगातील सर्वात मोठे ओझे (The heaviest burden in the world) असे सांगितले आहे. जम्मू कश्मीरचे एक पोलिस अधिकाऱ्यांने ताहिर अशरफ यांनी लिहले आहे की, जगातील सर्वात मोठे ओझे (The heaviest coffin), जर तुम्हाला हे दृश्य आतून धक्का बसू शकत नसेल, तर काहीही तुम्हाला कशाचाच धक्का पोहचू शकत नाही! मणिपूरमधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेले कर्नल विप्लव त्रिपाठी, त्यांची पत्नी आणि 10 वर्षांचा मुलगा यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. "

ऑपरेशन मेजर गौरव आर्य यांनी लिहले आहे की, प्रत्येक सैनिक युद्धामध्ये आपले जीव गमावण्यासाठी तयार असतो, पण हा अलिखित नियम असतो की, कुटुंबाना लक्ष्य बनवू नये. त्यांनी हा नियम मोडला आहे. त्यांनी त्याच्या(त्रिपाठीच्या) पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलाला खूप मारहाण देखील केली. आसम राईफल्सचे शहिद जवानांना आणि कर्नल विप्लव त्रिपाठीला माझी श्रध्दांजली.

मणिपूर हल्ल्यात शहीद झालेले कर्नल विप्लव त्रिपाठी हे अत्यंत नम्र होते. त्यांचे आजोबा

संविधान सभेचे सदस्य होते. उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनीशहिद झालेल्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्विट केले की, ''या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध आहे. कुटुंब आणि मुलांना लक्ष्य करणे हे भ्याड कृत्य आहे आणि हीन दर्जाचे कृत्य आहे''

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून दुख व्यक्त केले. ते म्हणाले की, मणिपूरच्या आसाम राईफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्याची तीव्र नींदा करतो. मी सैनिकांना आणि त्यांच्या परिवारांच्या सदस्यांना श्रद्धांजली देतो. त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही. या कठीण काळात कुटुंबियांसोबत माझी सहानुभूती आहेत.”सोमवारी कर्नल त्रिपाठी यांच्या घरी मोठया संख्येने लोक श्रध्दांजली अर्पन करण्यासाठी पोहचले.

शनिवारी कर्नल त्रिपाठी फॉरवर्ड कॅम्पवरून परतत असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. पीपल्स लिबरेशन आर्मी आणि नागा पीपल्स फ्रंट ऑफ मणिपूर यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

loading image
go to top