तृणमूलच्या नेत्यांविरुद्ध बदनामीचा गुन्हा दाखल करणार: बाबूल सुप्रियो

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नवी दिल्ली : रोझ व्हॅली चीट फंड गैरव्यवहारप्रकरणी तृणमूल कॉंग्रेसचे नेते तापस पाल, त्यांच्या पत्नी नंदिनी पाल आणि सौगाता रॉय यांनी आपल्या नावाचा समावेश केल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते बाबूल सुप्रियो हे दिवाणी व फौजदारी बदनामीचा गुन्हा दाखल करणार आहेत.

याबाबत बोलताना सुप्रियो म्हणाले, "मी त्यांच्याविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी जात आहे. मी माझ्या वकिलाच्या संपर्कात आहे. माझ्याकडे सर्व व्हिडिओ फुटेजेस उपलब्ध आहेत.' रोझ व्हॅली चीटफंड गैरव्यवहारप्रकरणी तृणमूलचे नेते तापस पाल आणि त्यानंतर खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना अटक करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला होता. तापस पाल आणि त्यांच्या पत्नी नंदिनी यांनीही सुप्रियो यांचा चीटफंड गैरव्यवहाराशी संबंध असल्याचे म्हटले आहे. तर, माजी केंद्रीय मंत्री सौगाता रॉय यांनीही एका टीव्ही शोमध्ये सुप्रियो यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान, सुप्रियो यांच्या निवासस्थानाबाहेरही तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी निदर्शकांनी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी सुप्रियो यांच्या अटकेचीही मागणी केली. तर काही निदर्शकांनी सुप्रियो यांच्या घरात घुसण्याचाही प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे सुप्रियो तक्रार दाखल करण्यात आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Trinamool Goons' Trying To Break Into Home, Minister Babul Supriyo Tweets Video