'हे तर भाजपचे एजंट!'; राज्यपालांना हटविण्यासाठी तृणमूलच्या हालचाली

'हे तर भाजपचे एजंट!'; राज्यपालांना हटविण्यासाठी तृणमूलच्या हालचाली
Updated on

कोलकाता : विधानसभा निवडणुकीनंतरही प.बंगालमधील अस्वस्थता कायम आहे. राज्यपाल जगदीश धनकर यांना हटविण्यासाठी तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) पत्र पाठविणार आहेत. त्याचप्रमाणे, राज्यपालांची बदली करण्याचा ठरावही विधानसभेत मांडला जाणार आहे. सत्ताधारी तृणमूल व राज्यपालांमध्ये सातत्याने खटके उडत आहेत. राज्यपाल धनकर यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्री बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी थेट दिल्ली गाठली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्यांनी राज्यपालांविरुद्ध तक्रार केली होती. राज्यपालांना रोखण्याची मागणीही त्यांनी केली होती. (Trinamool moves to remove governor Mamata Banerjee to send letter to PM Modi)

'हे तर भाजपचे एजंट!'; राज्यपालांना हटविण्यासाठी तृणमूलच्या हालचाली
भारतातील व्हेरिंयटवर फायझर-मॉडर्नाची लस ठरतेय प्रभावी

राज्यपालांकडून दररोज ट्विट व पत्रकार परिषद घेतली जात असल्याने संघर्ष अधिकच चिघळला. तृणमूलकडून राज्यपालांवर भाजपचे एजंट असल्याचा आरोप केला जात आहे. नारद भ्रष्टाचारप्रकरणी राज्यपालांनी तृणमूलचे नेत्यांविरुद्ध खटला भरण्यास परवानगी दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे, राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय विधीमंडळात सीआरपीएफ किंवा सीआयएसएफ जवानांना प्रवेश नाकारण्याच्या निर्णयावरही आक्षेप नोंदविला आहे. भाजप आमदार सुवेंदू अधिकारी आणि मुकल रॉय सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी या केंद्रीय दलाच्या पथकासह विधीमंडळात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com