संसदेतील पहिल्या दिवशी पेहरावावरून खासदार झाल्या ट्रोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

trinamool mp mimi chakraborty and nusrat jahan trolled for dressing up for parliamen

पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसमधून नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ, मिमी चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. संसदेतील पहिल्या दिवशी या दोन्ही खासदारांनी केलेल्या पेहरावाबाबत नेटिझन्सनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

संसदेतील पहिल्या दिवशी पेहरावावरून खासदार झाल्या ट्रोल

नवी दिल्लीः पश्चिम बंगालमधून मनोरंजनाकडून राजकीय क्षेत्राकडे वळालेल्या तृणमूल काँग्रेसच्या मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. संसदेमधील प्रवेशाचा दोघींचा आज (बुधवार) पहिला दिवस असून, नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे.

पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसमधून नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ, मिमी चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. संसदेतील पहिल्या दिवशी या दोन्ही खासदारांनी केलेल्या पेहरावाबाबत नेटिझन्सनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मात्र, काहींनी या पेहरावाचे समर्थनही केले आहे. 'हे संसद आहे, फोटोशूटची जागा नव्हे' असं म्हणत अनेकांनी या पेहरावाबाबत नाराजी व्यक्त केली.

यादवपूर मतदारसंघातून विजयी ठरलेली मिमी आणि बशीरहाटमधील विजयी खासदार नुसरत जहाँ संसद भवनमध्ये आपल्या ओळखपत्रासह दिसत आहेत. हे फोटो संसद भवनच्या बाहेरील आहेत. या दोनही खासदार पाश्चिमात्त पेहरावात संसदेत हजर झाल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर टिकांना महत्व देत नसल्याचे मिमीने म्हटले आहे. नुसरत जहाँने मात्र मौन बाळगले आहे. मिमी चक्रवर्तीने बंगाली चित्रपट भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी मॉडलिंग केले आहे. मिमी चक्रवर्तीने 2012 मध्ये 'बपी बारी जा' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदापर्ण केले होते.

पश्‍चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून तृणमूल कॉंग्रेसकडून निवडणूक लढवणारी अभिनेत्री नुसरत जहॉं (वय 29) विजयी झाली. या निवडणूकीत नुसरतने तब्बल तीन लाख 50 हजार 369 मतांनी विजय मिळवला आहे. नुसरतचा जन्म पश्‍चिम बंगालमधील कोलकतामध्ये 8 जानेवारी 1990 मध्ये झाला. बंगाली चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून नुसरतची ओळख आहे. कोलकातातील 'अवर लेडी क्वीन ऑफ द मिशन स्कूल'मधून तिने सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. भवानीपूर कॉलेजमधून तिने बी. कॉमची पदवी घेतली आहे. नुसरत सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर सतत ऍक्‍टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत फोटो व व्हिडिओ शेअर करत होती. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. 2011 मध्ये तिने बंगाली चित्रपट 'शोत्रू'मधून अभिनयाला सुरुवात केली. तिच्या अभिनयाची अनेकांनी प्रंशसा केली. पुढे तिने अनेक दिग्गज कलाकारांसोबत भूमिका निभावल्या. कोलकातामध्ये राहणाऱ्या व मॉडेल असलेल्या नुसरतने 'बोलो दुर्गा माई की', 'हर हर ब्योमकेश', 'जमाई 420' यांसारख्या चित्रपटांतून भूमिका साकार केल्या आहेत.

Web Title: Trinamool Mp Mimi Chakraborty And Nusrat Jahan Trolled Dressing Parliamen

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top