दोन मित्र अऩ् एक मैत्रिण; तर मैत्रिण कोणाची?

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

दोघे लहानपणापासूनचे मित्र. एकाचे गावातील एका युवतीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. मैत्रिणीला भेटायला जाताना तो मित्रालाही सोबत घेऊन जायचा. दोघांच्या प्रेमामध्ये मित्राने उडी घेतली अन् एकाला जीव गमवावा लागल्याची घटना येथे घडली.

लखनौ (उत्तर प्रदेश): दोघे लहानपणापासूनचे मित्र. एकाचे गावातील एका युवतीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. मैत्रिणीला भेटायला जाताना तो मित्रालाही सोबत घेऊन जायचा. दोघांच्या प्रेमामध्ये मित्राने उडी घेतली अन् एकाला जीव गमवावा लागल्याची घटना येथे घडली.

उत्तर प्रदेशातील हिरोली गावामध्ये त्रिकोणी प्रेमसंबंधाचा शेवट झाला असून, पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अटक केलेल्या भुरे नट नावाच्या युवकाने गुन्हा कबूल केला असून, याबाबतचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भुरे नटने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, दुर्वेश व मी लहानपणापासूनचे मित्र होतो. माझे गावातील एका युवतीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. तिला भेटायला जाताना मी दुर्वेशला सोबत घेऊन जायचो. ओळख झाल्यानंतर दुर्वेशही तिच्यासोबत बोलत असे. पुढे नोकरीसाठी मी मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर दुर्वेश व माझ्या मैत्रिणीमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. मध्यंतरी गावाकडे आल्यानंतर दोघांच्या प्रेमाची माहिती मला मिळाली. यामुळे मी नाराज झालो होतो. दुर्वेशला समजून सांगितले व पुन्हा मुंबईला गेलो. पण, दोघांचे प्रेमसंबंध सुरूच राहिले. गावाला गेल्यानंतर दुर्वेशला पुन्हा समजून सांगितले पण त्यांचे संबंध बरेच पुढे गेले होते. अखेर त्याचा खून करण्याचे ठरवले. त्याला सोबत घेऊन गावाबाहेर गेलो व त्याचा खून केला. माझ्या मित्रानेच मला फसवल्याने प्रेमाचा शेवट केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: triple love story end after boy murder friend at up