Tripura : काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेल्या माणिक साहांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर (Tripura Assembly Election) नवीन सरकार स्थापन झालं आहे.
Manik Saha Swearing In Ceremony
Manik Saha Swearing In Ceremonyesakal
Updated on
Summary

माणिक साहा यांनी 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते.

Manik Saha Swearing In Ceremony : त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर (Tripura Assembly Election) नवीन सरकार स्थापन झालं आहे. भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते माणिक साहा (Manik Saha) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये.

राज्यपालांनी साहा यांना शपथ दिली. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते.

सहा वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले माणिक साहा दुसऱ्यांदा त्रिपुराचे मुख्यमंत्री झाले आहेत. माणिक साहांचा डॉक्टर ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा राजकीय प्रवास खूपच रंजक राहिला आहे.

Manik Saha Swearing In Ceremony
DK Shivakumar : भाजपला धक्का बसणार? अनेक आमदार काँग्रेसच्या वाटेवर, प्रदेशाध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट

2022 मध्ये भाजपनं त्रिपुरातील लोकप्रिय भाजप नेते बिप्लब देव यांना हटवून माणिक साहा यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. यामागंही कारण होतं, सहा वर्षांपूर्वी साहा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपसारख्या केडरवर आधारित पक्षात ते इतक्या लवकर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षाही कोणी केली नव्हती.

Manik Saha Swearing In Ceremony
Delhi Liquor Scam : सिसोदियांनंतर CM चंद्रशेखर राव यांची मुलगी अडचणीत; ED नं बजावलं समन्स

2016 मध्ये भाजपमध्ये केला प्रवेश

माणिक साहा यांनी 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. हा असा काळ होता जेव्हा 2018 च्या निवडणुकीत दोन वर्षांनंतर भाजप डाव्यांचा हा बालेकिल्ला जिंकेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. 2018 मध्ये भाजपचे सरकार स्थापन झालं आणि बिप्लब देव यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. तोपर्यंत बिप्लब देव त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष होते. 2020 मध्ये माणिक साहा यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com