Tripura Assembly Election Result : त्रिपुरात काँग्रेसच्या पराभवानंतर रामदास आठवलेंनी राहुल गांधींना डिवचलं; म्हणाले...

नागालँडमध्ये आठवलेंच्या रिपाइंनं दोन जागा जिंकल्या आहेत.
ramdas rahul
ramdas rahul

Tripura Assembly Election Result : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला असून भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना 'भारत जोडो यात्रे'वरुन डिवचलं आहे. (Tripura Assembly Election Result Ramdas Athawale scolded Rahul Gandhi after defeat in Tripura)

आठवले म्हणाले, ईशान्य भारताचा पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली विकास होत आहे याचा परिणाम आज आपल्याला दिसतो आहे. आता आम्ही २०२४ च्या निवडणुका देखील जिंकू. राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रे'मध्ये उगाचच वेळ वाया घालवला. काँग्रेस आता विखुरली आहे, त्यांनी त्रिपुरा गमावलं आहे.

ramdas rahul
Chinchwad Bypolls Results : विजयासमीप असलेल्या अश्विनी जगताप म्हणाल्या राहुल कलाटेंमुळे...

दरम्यान, त्रिपुरामध्ये ६० जागांवर निवडणूक झाली यामध्ये सर्वाधिक ३३ जागा जिंकत भाजपनं यामध्ये स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर काँग्रेसला इथं १४ जागा आणि तृणमूल काँग्रेसला १३ जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळं इथं कोणाच्याही मदतीशिवाय भाजपचं सरकार स्थापन होणार आहे.

हे ही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

त्याचबरोबर नागालँड आणि मेघालय राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकालही आजच घोषित झाले. यामध्ये मेघालयात भाजप ६० पैकी ३ तर काँग्रेसला ५ जागा मिळाल्या आहेत. तिथं सर्वाधिक मोठा पक्ष नॅशनल पिपल्स पार्टीनं सर्वाधिक २५ जागा तर इतरांनी मिळून २६ जागा जिंकल्या आहेत. तर नागालँडमध्ये ६० पैकी सर्वाधिक ३७ जागा भाजपनं जिंकल्या आहेत. या ठिकाणी रिपाइंला दोन आणि राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com