Tripura Election :निवडणुकीच्या निकालानंतर हिंसेचा राज्याचा इतिहास; यंदा काय होणार? | Tripura Election History of state Violence Election result Tripura Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tripura Assembly election DA of government employees will increased twice a year
Tripura Election :निवडणुकीच्या निकालानंतर हिंसेचा राज्याचा इतिहास; यंदा काय होणार?

Tripura Election :निवडणुकीच्या निकालानंतर हिंसेचा राज्याचा इतिहास; यंदा काय होणार?

त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज घोषित होत आहेत. त्यानिमित्ताने आज त्रिपुरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दलांनी फ्लॅग मार्च केला आहे, तसंच परिसरातली गस्तही वाढवली आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारच्या हिंसेची घटना रोखण्यासाठी त्रिपुराच्या सगळ्या ६० विधानसभा क्षेत्रांमध्ये अनेक शांती बैठका घेतल्या. तसंच त्रिपुराचे मुख्य सचिव जे.के.सिन्हा, पोलीस महासंचालक अमिताभ रंजन, तसंच निवडणूक अधिकाऱ्यांनी आठ जिल्ह्यांचे दौरे केले.

त्रिपुरात यापूर्वी अनेकदा निवडणुकांच्या निकालानंतर हिंसा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, अधिकाऱ्यांनी त्रिपुरासोबतच ८५६ किलोमीटर लांबीची भारत बांग्लादेश सीमा आणि आसाम, मिझोरमसोबतच्या आंतरराज्य सीमांवरची सुरक्षा अधिक कडक केली आहे.

तसंच संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळी गस्त घालणे, वाहनं तसंच हॉटेल्सची तपासणी, सीसीटीव्ही, अशा उपाययोजनही करण्यात आल्या आहेत.