Bamboo Farmingsakal
देश
Bamboo Farming : त्रिपुरात बांबू उत्पादनात होणार शंभर पटींनी वाढ; ४६१ हेक्टरवरून ४५ हजार हेक्टरपर्यंत वाढणार
Tripura Agriculture : त्रिपुरा सरकारने औद्योगिक बांबू उत्पादनात शंभरपट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील पाच वर्षांत बांबू लागवड ४६१ हेक्टरवरून थेट ४५ हजार हेक्टरवर नेली जाणार आहे.
आगरताळा : त्रिपुरा सरकारने केवळ औद्योगिक वापरासाठी राज्यातील बांबू उत्पादनात शंभरपट वाढ करण्यासाठी पंचवार्षिक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत येत्या पाच वर्षांत बांबूचे सध्याचे ४६१.३२ हेक्टर क्षेत्र शंभरपटीने वाढवून ४५ हजार हेक्टरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशात अगरबत्तीसाठी लागणाऱ्या बांबूच्या काड्यांपैकी ७० टक्के उत्पादन एकट्या त्रिपुरात होते.

