महिला आढळली शेजाऱ्याच्या घरात; नवरा आणि गावकऱ्यांकडून मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


beating the woman

महिला आढळली शेजाऱ्याच्या घरात; नवरा आणि गावकऱ्यांकडून मारहाण

आगरतळा : त्रिपूरामधील खोवई जिल्ह्यात एका ३५ वर्षीय महिलेला तीच्या नवऱ्याकडून आणि गावकऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली असून सदर महिलेचा नवरा शेजाऱ्याच्या घरात घुसला असता त्याला एका व्यक्तीबरोबर त्याची पत्नी आढळून आली होती.

पोलिस म्हणाले की, नवऱ्याला त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीवर त्याच्या पत्नीसोबत संबंध असल्याचा संशय होता. यावरुन सदर महिलेचा नवरा शेजारील संशयित व्यक्तीच्या घरात घुसल्यानंतर त्याला पत्नी आणि संशयित व्यक्ती नजरेस आले. यावरुन त्या दोघांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले असून या प्रकारानंतर गावकऱ्यांनी आणि तीच्या नवऱ्यांनी संशयित व्यक्तीसोबत लग्न लावून देण्यासाठी दबाव आणला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा: 'लैंगिक संबंध नाकारणे' हे घटस्फोटासाठी कारण होऊ शकत नाही: दिल्ली उच्च न्यायालय

"आम्ही महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवला असून तपासाला सुरुवात केली आहे." असं तेलियामुरा उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाचरण जमातिया यांनी सांगितलं. तसेच याप्रकरणी गुन्हा नोंदवताना भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांमध्ये अतिक्रमण करणे, गंभीर दुखापत करणे, महिलेचा विनयभंग करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे या कलमांचा सामावेश आहे. एकाही आरोपीला यासंदर्भात अटक केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

ही घटना राज्याच्या राजधानीपासून ६० किमी अंतरावर असलेल्या खोवई मधील कृष्णपूरमध्ये शनिवारी रात्री घडली आहे. सदर महिलेला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून मारहाण करण्यात आलेल्या संशयित व्यक्तीला रुग्णालयातून सुटका मिळाली आहे.

Web Title: Tripura Women Beaten Husband Extra Marital Affaire

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TripuracrimeAffair News