इम्रान खान, भारताविरूद्ध जपून बाेला; ट्रम्प यांचा सल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

काश्मीरमधून 370 कलम हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नावर भारताविरुद्ध सांभाळून, मर्यादेत बोलावे, असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खान यांना दिला आहे.

वॉशिंग्टन : काश्मीरमधून 370 कलम हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नावर भारताविरुद्ध सांभाळून, मर्यादेत बोलावे, असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खान यांना दिला आहे.

ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कठीण परिस्थितीपासून वाचण्यासाठी दोन्ही देशांनी संयम बाळगावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात सोमवारी ३० मिनिटे फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी चर्चा केली. फोनवरील चर्चेदरम्यान मोदी यांनी ट्रम्प यांना हे निदर्शनास आणून दिले होते की, पाकिस्तानचे नेते भारताविरुद्ध चिथावणीखोर विधाने करीत आहेत.

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. काश्मीरबाबत विधाने करताना संयम बाळगण्यास सांगितले. काश्मीर प्रश्नावर भारताविरुद्ध आपली मोहीम सुरू ठेवताना इम्रान खान रविवारी असे म्हणाले होते की, भारत सरकार हे हुकूमशाही आणि वर्चस्ववादी आहे. तसेच, पाकिस्तान आणि भारतातील अल्पसंख्याकांसाठी हा धोका आहे. भारताच्या अण्वस्त्र सुरक्षेबाबत जगाने विचार करायला हवा, कारण त्याचा जगावर परिणाम होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trump rings up Khan, asks him to tone down rhetoric against India