Donald Trump : वाहन उद्योगाला धोरणबदलाची गरज; ट्रम्प यांच्या निर्णयाने वाहन क्षेत्रात चिंता
Indian Exports : अमेरिकेच्या अध्यक्ष ट्रम्प यांनी वाहन आयात शुल्क २५ टक्के करण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय वाहन उद्योगात चिंतेचे वातावरण आहे. या टॅरिफमुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊन नोकऱ्यांवरही संकट येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वाहनांवर २५ टक्के आयातशुल्क (टॅरिफ) जाहीर केल्यामुळे भारतीय वाहन उद्योगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.