
नवी दिल्ली : उत्तराखंडमधील ऋषिकेश ते कर्णप्रयाग हा १२५ किलोमीटरचा रेल्वेमार्ग तयार केला जात असून या मार्गातील एक बोगदा अत्यंत वेगाने खोदून पूर्ण करण्यात रेल विकास निगमला यश आले आहे. बोगदा खोदण्यातील हा वेग जगातील दुसऱ्या क्रमांकाचा असल्याचे रेल महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप गौर यांनी सांगितले.