esakal | पाकिस्तान सीमेवर मिळाली भुयार; ''नगरोटात आलेले दहशतवादी येथूनच आले होते आत''
sakal

बोलून बातमी शोधा

tunnel.

जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बीएसएफच्या जवानांना एक भुयार सापडली आहे.

पाकिस्तान सीमेवर मिळाली भुयार; ''नगरोटात आलेले दहशतवादी येथूनच आले होते आत''

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बीएसएफच्या जवानांना एक भुयार सापडली आहे. बीएसएफचे आयजी एनएस जामवाल यांनी माहिती दिली की, अशी शक्यता आहे की नगरोटा एनकाऊंटरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांनी याच भूमिगत भुयारातून भारतीय सीमेत घुसखोरी केली होती. या भुयारला बीएसएफ आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी गस्त घालत असताना शोधून काढलं आहे.   

जामवाल म्हणाले की, असं वाटंतय की नगरोटा एनकाऊंटरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांनी 30 ते 40 मीटरच्या भुयारमधून भारतीय सीमेत घुसखोरी केली. हा नवा भुयार आहे. आम्हाला वाटतं की त्यांना कोणत्यातरी गाईडने मदत केली आहे, ज्याने त्यांना येथून हायवेपर्यंत घेऊन गेले.  मागील आठवड्यात जम्मू-काश्मीर हायवेच्या जवळ नगरोटा टोल प्लाझाजवळ झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी सांबा सेक्टर आंतरराष्ट्रीय सीमेजवळूनच भारतात घुसखोरी केली होती. 

शुक्रवारपासून सुरु आहे एँटी टनलिंग अभियान

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शुक्रवारपासून सीमा भागात एँटी टनलिंग अभियान सुरु करण्यात आले आहे. याअंतर्गत सीमेवरील अवैध भुयारांचा पता लावला जात आहे. बीएसएफसोबत आर्मी आणि पोलिसही या कामात गुंतले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयातील वरीष्ठ अधिकाऱ्याला पाचारण करत जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप नाकारला. आम्हाला हे आरोप अमान्य असून भारताने यापुढे चुकीचा निष्कर्ष काढणे बंद करावे, असे आवाहनही पाकिस्तानने केले. जम्मू-काश्‍मीरमध्ये नगरोटा येथे झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट उधळून लावला होता. या दहशतवाद्यांना पाकिस्तानाचाच पाठिंबा असल्याचा दावा करत भारताने काल पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील वरीष्ठ अधिकाऱ्याला पाचारण करत निषेध नोंदविला होता.