मंदिर असो वा मशिद भोंगे उतरवलेच पाहिजेत; राकेश टिकैत यांचं समर्थन I Rakesh Tikait | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakesh Tikait

सध्या देशभरात हनुमान चालिसा आणि मस्जिद भोंगा वाद चांगलाच गाजत आहे.

मंदिर असो वा मशिद भोंगे उतरवलेच पाहिजेत; राकेश टिकैत यांचं समर्थन

सध्या देशभरात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आणि मस्जिद भोंगा वाद चांगलाच गाजत आहे. त्यातच आता देशातील शेतकऱ्यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी भोंगा प्रकरणावर पहिल्यांदाच आपली बाजू मांडलीय.

छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या राकेश टिकैत यांना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं भोंग्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी भोंगे बंद झाले पाहिजेत, असं स्पष्ट मत मांडलंय. टिकैत पुढं म्हणाले, सर्वाधिक आवाज करतात असे भोंगे बंद झाले पाहिजेत. मग ते मंदिर असो किंवा मशिद. कुठंही लाउड स्पिकर नकोय. उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवले, ते चांगले झाले. लाउड स्पिकर बंद व्हावे ही भाजपची नाही तर जनतेची मागणीय. त्यामुळं ते झालं पाहिजे, असं स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा: Congress : काँग्रेस नेते कमलनाथ यांचा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राकेश टिकैत रायपूर इथं पोहोचले होते. 27 गावांचं भूमी अधिग्रहणाचं प्रकरण आहे. 20 ते 25 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा, त्यांना जमिनीचा योग्य दर मिळावा, यासाठी टिकैत आग्रही भूमिका घेत आहेत. मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात बोलणं झालेलं नाही. समितीशी आज बोलणार आहोत, असं टिकैत यांनी सांगितलं.

Web Title: Turn Off Loudspeakers In Temples And Mosques Rakesh Tikait

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Chhattisgarhrakesh tikait
go to top