चंद्र बघण्याच्या नादात जुळ्या भावंडांच्या आयुष्याचा शेवट

रात्री एकच्या सुमारास आईला जाग आली, तेव्हा दोन्ही मुलं जागेवर नव्हती.
balcony
balconyfile phto

गाझियाबाद: एका दुर्देवी घटनेमध्ये दोन जुळ्या भावंडांना (twins) आपल्या प्राणाला मुकावे लागले. २५ व्या मजल्यावरच्या गॅलरीतून पडून १३ वर्षीय जुळ्या भावंडांचा मृत्यू झाला. गाझियाबाद (Ghaziabad) विजय नगरमधील हाऊसिंग सोसायटीत ही दुर्देवी घटना घडली. घरात रेलिंग जवळच्या प्लास्टिक खुर्चीवर एक छोटं टेबल ठेवण्यात आल्याचं आढळून आलं. दोन्ही भावंडांना चंद्र बघायचा होता, असं आईने सांगितलं. रविवारी रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला.

रात्रीचे जेवण झाल्यानंतर सत्य नारायण आणि सूर्य नारायण मुदालिया दोघेही गॅलरीमध्ये गेले होते. शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास दोन्ही मुलं ऑनलाइन वर्गासाठी दिलेल्या मोबाइलसोबत खेळताना आईला दिसली. आईने त्यांना झोपण्यासाठी म्हणून रुममध्ये जायला सांगितले. दोन्ही मुलांनी आईचं ऐकलं. पण काही वेळाने ते नजर चुकवून खोलीतून बाहेर पडले व गॅलरीत गेले, असे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

balcony
मुंबईला येणाऱ्या विमानात अभिनेत्रीचा लैंगिक छळ, बिझनेसमॅनला अटक

रात्री एकच्या सुमारास आईला जाग आली, तेव्हा दोन्ही मुलं जागेवर नव्हती. ती स्टडी रुममध्ये गेली. तेव्हा गॅलरीचा दरवाजा उघडा होता. तिने रेलिंगवरुन खाली बघितले, त्यावेळी रस्त्यावर लोकांची गर्दी जमली होती. आई खाली उतरुन गेली त्यावेळी दोन्ही मुल रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

balcony
सीमेजवळ चीनने युद्ध सराव वाढवला, आर्मी सुद्धा अ‍ॅक्शनसाठी सज्ज

मुलांचे वडिल खासगी कंपनीत अधिकारी असून घटना घडली त्यावेळी ते घरी नव्हते. कामानिमित्त मागच्या दोन-तीन आठवड्यांपासून ते बाहेर आहेत. हे कुटुंब मूळचे चेन्नईचे आहे. कामानिमित्त म्हणून दोनवर्षांपूर्वी ते गाझियाबादला आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com