देशभरात ट्विटर डाउन 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

मुंबई, हैद्राबाद, बंगळुरू येथे ट्विटरची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. तर कोलकता आणि अहमदाबाद या शहरांमध्ये काही ठिकाणी ट्विटर डाउन झाले असल्याच्या तक्रारी यूजर्सकडून करण्यात येत आहेत.

मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर बुधवारी (ता.21) सायंकाळी ठप्प झाली. मुंबई, हैद्राबाद, बंगळुरू येथे ट्विटरची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. तर कोलकता आणि अहमदाबाद या शहरांमध्ये काही ठिकाणी ट्विटर डाउन झाले असल्याच्या तक्रारी यूजर्सकडून करण्यात येत आहेत.

या वर्षभरात आतापर्यंत दोन वेळा ट्विटरची सेवा विस्कळीत झाली आहे. 3 जून आणि जुलै महिन्यात 12 आणि 4 तारखेला काही वेळ ट्विटर बंद झाले होते. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ट्विटर ठप्प झाले. भारतासह जपान, अमेरिका, ब्राझील, लंडन, डेन्मार्क, बेलगियम, स्वीडन आणि न्यूयॉर्क या देशांमध्येही ट्विटर डाउन झाले.

देशात युजर्सचे फीड रिफ्रेश होत नव्हते. तर काही युजर्सना कमेंट, रिट्विटीट करण्यात अडचण येत होती. या तांत्रिक बिघाडाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter down across the country